ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना,९०% अनुदानावर १० शेळ्या १ बोकड.
राज्यात शेळी पालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना सुरू करून ९०% अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड असे शेळी गट वाटप होण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहे.
ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना,९०% अनुदानावर १० शेळ्या १ बोकड. योजनेअंतर्गत देण्यात येणारे लाभ :-
- उस्मानाबाद /संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तर घरातील अशा प्रजातींच्या पैदा सक्षम 10 शेळ्या व १ बोकड असा शेळीगट वाटप करण्यात येईल.
- एकूण रक्कम रु.६६०००/-
- लाभार्थीसाठी ९०% शासन हिस्सा (रू.५९,४००/-) व १०% लाभार्थी हिस्सा (रू.६६००/-)
पात्रता :-
- अनुसूचित जाती जमातीसाठी
- दारिद्र रेषेखालील लाभार्थी
- अल्पभूधारक (एक ते दोन हेक्टर पर्यंत भूधारक)
- महिला लाभार्थ्यांनाच ही प्राधान्य.
- लाभ धारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना अंतर्गत गेल्या तीन वर्षांमध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
- अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्वराज्य संस्थां मध्ये सेवक किंवा सेवानिवृत्त किंवा शासकीय पदाचा लाभ घेणारा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य किंवा पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी नसवा.
अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती :-
- अर्ज सादर करण्याचा कालावधी १०/१२/२०२२ ते २५/१२/२०२२ पर्यंत आहे .
ऑनलाईन अर्ज (Apply Online ) :- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :- http://mahamesh.co.in/en/Menu/MahameshYojanaUserLogin