पशुसंवर्धन विभाग यांच्या वैयक्तिक लाभार्थी योजना साठी ऑनलाईन अर्ज सुरू(गाई ,म्हशी, शेळ्या मेंढ्या व कुक्कुटपालन)

Spread the love

 

पशुसंवर्धन विभाग यांच्या वैयक्तिक लाभार्थी योजना साठी ऑनलाईन अर्ज सुरू(गाई ,म्हशी, शेळ्या मेंढ्या व कुक्कुटपालन)

पशुसंवर्धन विभाग यांच्या वैयक्तिक लाभार्थी योजना साठी ऑनलाईन अर्ज सुरू(गाई ,म्हशी, शेळ्या मेंढ्या व कुक्कुटपालन).

     राज्याने खास योजना ग्रामीण भागातील तरुण व बेरोजगार तरुण व पशुपालक शेतकरी यांच्यासाठी ही योजना अत्यंत चांगली आहे. आणि शेतकरी तरुणांना स्वयं रोजगार उपलब्ध होतील. पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभांच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

     जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा आणि ग्रामीण भागातील तरुणांना एक व्यवसाय निर्माण करता यावा यासाठी ही योजना चांगली आहे.

    राज्याच्या ग्रामीण भागातील तरुणांना जास्तीत जास्त व्यवसाय निर्माण व्हावे व ते स्वतः आपल्या पायावर उभे राहून यासाठीही पशुसंवर्धन विभागाने ही योजना आखलेली आहे व यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेली आहे. आणि लाभार्थी निवड योजना ही सुरू झालेली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरावर संगणक प्रणाली सुद्धा या योजनेसाठी चालू करण्यात आलेली आहे. यामध्ये एखाद्या योजनास आपण अर्ज केला असेल तर आपल्याला तो अर्ज पुन्हा पुन्हा परत दरवर्षी करायची गरज नाही. अर्ज भरल्यापासून पुढील पाच वर्षापर्यंत आपण अर्ज भरण्याची काही गरज नाही. ज्यावेळेस तुमची यादीत नावे त्यावेळेस तुम्हाला ते तुमच्या संगणक प्रणाली किंवा मोबाईलवर कळविण्यात येईल.

     नवीन  राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत तुझा गाई म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मासल कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी शेड उभारणीच अर्थसहाय्य देणे. शंभर कुक्कुटपालन पिलांची योजना, 253 तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022 23 या वर्षांमध्ये राबवली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी किंवा पोटरी फार्म किंवा शेळीपालन यासाठी अर्ज करायचा असल्यास ही सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

      आपण हा अर्ज आपल्या मोबाईलवर पण भरू शकतात किंवा आपण एखाद्या ऑनलाइन सेंटर किंवा सीएससी सेंटरवर जाऊन पण हा अर्ज भरू शकतात ज्यावेळेस आपण अर्ज भरणार आहे त्यावेळी जो मोबाईल नंबर देणार आहे तो मोबाईल नंबर चेंज करू नये किंवा कारण की त्या मोबाईल नंबर द्वारे आपल्याला कळवण्यात येणार आहे.

अर्ज करण्याचा कालावधी :- 

 चालू दिनांक :- 11 नोव्हेंबर 2022.

 समाप्त दिनांक :- 17 डिसेंबर 2022.

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजना :- 

1) दोन गाई/म्हशीची वाटप करणे:- 

 संकरित गाय – एच. एफ./जर्सी म्हैस/ जाफरबादी देशी गाय- गीर, रेड सिंधी ,राठी, थारपारकर देऊनी, लाल कंधारी, डांगी.

 सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरी, तसेच पुणे, सातारा,सांगली,सोलापूर, कोल्हापूर, व अहमदनगर या जिल्ह्यांतर्गत ही योजना राबवली जाणार आहे.

लाभार्थी निवडीचे निकष:- 

1) अल्पभूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पोरांचे अल्पभूधारक)

2) महिला बचत गट 

3) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार या केंद्रात नाव नोंदणी असलेले.) 

एका गटाची प्रकल्प किंमत:- 

१) संकरित गाई /म्हशींचा गट- प्रती गाय/म्हैस रू.40000/- प्रमाणे .

एकूण गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान व स्वाहिस्सा मर्यादा :- 

१. शासकीय अनुसूचित जाती 75%  रक्कम – 31989/- 

२. स्वाहिस्सा अनुसूचित जाती 25% रक्कम – 10632/-

३. शासकीय अनुदान सर्वसाधारण 50% रू – 21265/- 

४. स्वाहिस्सा सर्वसाधारण 50% रू – 21265/- 

अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे :- 

१) सातबारा

२) ८- अ उतारा 

३) अपत्य दाखला 

४) आधार कार्ड 

५) अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीचा दाखला.

६) रहिवासी प्रमाणपत्र.

७) दारिद्र्यरेषेखालील असलेले प्रमाणपत्र.

८) बँक खाते पासबुक.

९) रेशन कार्ड

१०) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

२) ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी १० शेळ्या/ मेंढ्या व १ बोकड / नर मेंढ्या याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे :– 

टीप :- 

१) सदरील योजना ही मुंबई ,मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे.

२) योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

३) योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये ठोक धरणाऱ्या व तसेच उत्तम स्वस्त असलेल्या शेळ्या वाटप करण्यात येणार आहे.

लाभार्थी निवडीचा निकष :- 

१) दारिद्र रेषेखालील लाभार्थी

२) अल्पभूधारक शेतकरी ( एक हेक्टर पर्यंतचे भूधारक) 

३) सुशिक्षित बेरोजगार

४) महिला बचत गट लाभार्थी 

एका गटातील किंमत खालील प्रमाणे:- 

१) शेळ्या खरिदी रक्कम रू – ८०००/- प्रती शेळी.

२) बोकड खरिदी – रू – १०,०००/- प्रती बोकड.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा:- 

 पशुसंवर्धन विभागाची अधिकृत पोर्टल:- 

http://ah.mahabms.com/webui/registration

संपर्क :- योजने संदर्भात अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याशी संपर्क साधा.

योजना बाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक:- १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या क्रमांकावर कॉल करावा.

 काही अडचणी येत असल्यास जवळच्या सीएससी केंद्राला भेट देणे किंवा ऑनलाईन सेंटरला भेट देणे.

    















Spread the love

Leave a Comment