राष्ट्रीय वयोश्री योजना- Rashtriy Vayoshri Yojna.
राष्ट्रीय वयोश्री योजना ही ज्येष्ठ नागरिक यांच्या शारीरिक मदतीसाठी आहे. आणि सहाय्यक जिवंत उपकरणे प्रदान करण्याची योजना आहे. ही योजना बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आहे. ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. याला पूर्णपणे केंद्रीय सरकारचा निधी दिला जातो. योजनेसाठी होणारा खर्च “जेष्ठ नागरिक कल्याण निधी” मधून भरला जातो.
या योजनेची अंमलबजावणी आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन या एजन्सी मार्फत करण्यात येते. 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना आवश्यक असणारी भौतिक उपकरणे मिळतील. ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुख्य निकष ते बीपीएल कुटुंबातील असले पाहिजे आणि संबंधित प्रधिकरणाद्वारे जारी केलेले किंवा वैद बीपीएल कार्ड त्यांच्याकडे असले पाहिजे.
ज्येष्ठ नागरिक की बीपीएल श्रेणीत आहे आणि ते पहिले चेक केले जाईल. आणि ते त्या वयाशी संबंधित कोणत्याही आजाराची पीडित असले किंवा कमी दृष्टी,ऐकण्यासाठी न येणे, अपंगत्व अशा व्यक्तींना हे उपकरणे प्रदान केले जातील.
राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत देण्यात येणारी उपकरणे :-
- चालण्याची काठी
- कोपर क्रेचेस
- चष्मा
- कृत्रिम दात
- श्रवण यंत्र
- ट्रायपॉड
- व्हील चेअर
- प्रत्येक लाभार्थ्यास डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपकरणे पुरवले जातील.
- या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील (BPL) ज्येष्ठ लोकापर्यंत पोहोचवला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- राष्ट्रीय वयोश्री योजना 2021 अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना उपकरणे विनाशुल्क दिले जातील.
- कुटुंबांची साधन संख्या कुटुंबातील लाभार्थी सदस्यांच्या संख्येवर अवलंबून असेल.
- अर्जदार हा भारतीय असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत ज्या वृद्धांना पात्र मानले जाईल त्यांचे वय कमीत कमी हे 60 वर्षे असणे आवश्यक आहे.
- बीपीएल/ एपीएल प्रवर्गातून येणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- रेशन कार्ड.
- आधार कार्ड.
- सेवा निवृत्ती निवृत्तीवेतन बाबतीत संबंधित कागदपत्रे लागतील.
- वैद्यकीय अहवाल सुद्धा लागेल.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.