उद्योगासाठी आता तरुणांना मिळणार 15 लाख रुपये ! अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेमधून.

Spread the love

 

उद्योगासाठी आता तरुणांना मिळणार 15 लाख रुपये ! अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेमधून.

उद्योगासाठी आता तरुणांना मिळणार 15 लाख रुपये ! अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेमधून.

          उद्योजक बनू इच्छिणाऱ्या मराठा समाजातील युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज, व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 10 लाखांचे असलेली मर्यादा आता 15 लाखापर्यंत करण्यात आली आहे. यासाठी मात्र रकमेची मर्यादा असणार आहे. कर्ज वितरण या बाबींमध्ये बुलढाणा जिल्हा हा सर्वप्रथम आहे.

          आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मराठा समाजातील युवकांना युद्ध उद्योग करता यावा. व्यवसायामध्ये उभारी घेता यावी, त्यासाठी वैयक्तिक कर्ज योजना राबवली जाते.

          या अंतर्गत युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाख होती. महामंडळाची कर्ज घेण्याची संख्या वाढत आहे. शिवाय नियमित कर्ज फेड करणाऱ्यांची संख्या ही खूप कमी आहे. त्यामुळे महामंडळाने व्याज पर्तव्याची योजना ही 15 लाख रुपये केली आहे. या अंतर्गत व्याज परतावा 4 लाख 50 हजार मर्यादित केला जाणार आहे.

          अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्ज वितरणात बुलढाणा जिल्हा प्रथम आला आहे. जिल्ह्यात वैयक्तिक कर्ज परतावा योजनेत 1000 लाभार्थ्यांना 185 कोटींचे कर्ज वितरण्यात आले आहे.

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन योजना :- 

1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना:- 

         वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत उद्योग उभारणी, नवीन व्यवसाय सुरू करणे अशा विविध कारणासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध झाल्यानंतर महामंडळ त्याचे व्याज भरते.

  अट काय आहे :- 

        1.उमेदवाराच्या वयोमर्यादीची अट पुरुष व महिला करता जास्तीत जास्त 60 वर्ष.

        2. वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा 8 लाखापर्यंत असावी.

        3. योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच इतर काही अटी आहे.

2. गट कर्ज व्याज परतावा योजना:- 

         दोन व्यक्तीसाठी मर्यादा 25 लाख,तीन व्यक्तीसाठी मर्यादा 35 लाख, चार व्यक्तीसाठी मर्यादा 45 लाख, पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीसाठी मर्यादा 50 लाख मरेदीवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करील.

  अट काय आहे :- 

     1. या योजनेअंतर्गत भागीदारी संस्था,सहकारी संस्था,बचत गट, एल. एल .पी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट संस्था लाभास पात्र असतील.

    2. शेती पूरक व्यवसाय करणाऱ्यांना व महिला बचत गटाकरिता कमाल वयोमर्यादेची अट वगळण्यात आलेली आहे.

3. गट प्रकल्प कर्ज योजना:- 

         एकूण प्रकल्प योजनेच्या 10 टक्के रक्कम गटांनी जमा करणे बंधनकारक असेल आणि उर्वरित 90 टक्के रक्कम महामंडळ कर्ज स्वरूपात अदा करेल. परंतु प्रकल्पाची किंमत ही रुपये, 11 लाखापेक्षा जास्त असल्यास गटाने प्रकल्पाची उर्वरित रक्कम इतर श्रोतातून जमा केल्याचा पुरावा ऑनलाईन सादर करावा.

  अट काय आहे :- 

  1. या योजनेअंतर्गत  एफपीओ गटांची संख्या 20 पेक्षा जास्त असल्यास संबंधित गटाच्या संचालकांनी सर्व सदस्यांच्या उत्पन्नाचे पुरावे आपण करणे गरजेचे आहे.

दहा महिन्यात कोणत्या योजनेचे किती लाभार्थी:- 

   1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना:- 1271

   2. गट कर्ज व्याज परतावा योजना:- 02

   3. गट प्रकल्प कर्ज योजना वाटप:- 06 

ऑनलाइन अर्ज कसा करावा:- 

       महामंडळ मार्फत कर्ज घ्यावयाचे असेल तर https://www.mahaswayam.gov.inया संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.













Spread the love

Leave a Comment