कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज सुरू ! Krushi Avjare Bank
कृषी विभागामार्फत 2022- 23 साठी कृषी कल्याण अभियान-3 मोहिमेअंतर्गत जिल्हा करता कृषी यांत्रिकीकरण उपअभियानामधील गट क्रमांक सहा नुसार कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी. शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, बचत गट विविध कार्यकारी संस्था यांनी 9 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.
कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 10 लाख खर्चाची मर्यादा असून त्याकरिता 80 टक्के किंवा अनुदानाची उच्चतम मर्यादा 8 लाख या पैकी जी कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान लाभार्थ्यास डीबीटी प्रणाली द्वारे वितरित करण्यात येईल.
योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे कार्यालयात अर्ज 9 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करावे. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी कृषी विभागाची वेबसाईट :- https://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx