गॅस सिलेंडर फसवणुकीला बसणार आता आळा ! आता येणार आहे QR Code प्रणाली | Gas Cylinder New Updates

Spread the love

 

गॅस सिलेंडर फसवणुकीला बसणार आता आळा ! आता येणार आहे QR Code प्रणाली | Gas Cylinder New Updates

गॅस सिलेंडर फसवणुकीला बसणार आता आळा ! आता येणार आहे QR Code प्रणाली | Gas Cylinder New Updates 

 

गॅस सिलिंडर ची नवीन updated माहिती  :- 

         तुम्हाला कधी असे वाटते का तुमच्या येणारा घरगुती गॅस हा कमी आहे किंवा वजन जास्त नाही किंवा हा खूप हलका वाटतोय त्याच्या टेन्शन तुमचा आता मिटणार आहे. कारण आता LPG गॅस सिलेंडर ला QR Code आहे यामध्ये किंवा कोड स्कॅन केला व त्याचे वजन एक्सपायरी डेट सगळं असणार आहे. ही सर्व योजना येत्या 3 महिन्यात चालू होणार आहे.

        आता सिलेंडर मधील फसवणूक टाळण्यासाठी सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे कधीकधी आपल्याला वाटते की आपल्या गॅस सिलेंडरचे वजन हे खूप कमी आहेत आपली शंका आता ही सगळी दूर होणार आहे. आणि QR Code प्रणालीमुळे गॅस फसवणुकी कमी होईल.

नवीन आणि जुने गॅस सिलेंडर दोन्हीवर पण क्यूआर कोड बसवला जाईल :- 

  हे QR Code नवीन आणि जुन्या गॅस सिलेंडर दोन्हीवर पण असणार आहे. जुने गॅस सिलेंडरवर QR Code मेटल स्टिकर वेल्डेड याने केले जाईल. आणि नवीन गॅस सिलेंडर आधीच कोड updated  राहील.

QR Code बाटली बंद करण्यापासून वितरणापर्यंतची प्रक्रिया पारदर्शक करेल :- 

        QR Code च्या मदतीने घरगुती एलपीजी ग्राहकांना त्यांच्या घरी येणार आहे एलपीजी कोणत्या प्लॉटमध्ये बाटली बंद करण्यात आला आहे हे सहज कळू शकेल, त्याचे वितरक कोण आहे. इंडियन ऑइल चे म्हणणे आहे की हा क्यूआर कोड एक प्रकारे LPG सिलेंडरचे आधार कार्ड असेल.

सिलेंडरचे आयुष्य 15 वर्षे :- 

        घरामध्ये वापरले जाणारे LPG सिलेंडर बीआयएस 3196 मानकांच्या आधारे बनवले जातात. सिलेंडरचे आयुष्य 15 वर्षे असणार आहे. एलपीजी सिलेंडरची चाचणी या काळात दोनदा केली जाते. पहिली चाचणी सिलेंडरची 5 वर्ष पूर्ण झाल्यावर आणि दुसरी चाचणी 10 वर्ष पूर्ण झाल्यावर केली जाते.

हेही वाचा डाक  विभागाची सुकन्या समृद्धी योजना 👇

https://maharashtrasarkaryojna.blogspot.com/2022/11/indian-post-scheme.html

            


Spread the love

Leave a Comment