महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना 75 हजार रुपये अनुदान योजना.

Spread the love

 

महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना 75 हजार रुपये अनुदान योजना.

महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना 75 हजार रुपये अनुदान योजना.

       मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे, यामध्ये विविध आकाराचे शेततळे समाविष्ट आहे. त्यापैकी शेतकरी कोणत्याही एका शेततळ्यासाठी अर्ज करू शकतात. म्हणून त्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. तसेच विविध आकारमानाचे शेततळे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी कोणतेही शेततळे घेतले तरी 75 हजार रुपये एवढेच अनुदान मिळणार आहे.

         शेतकऱ्यांनी अर्ज हा महाडीबीटी प्रणालीवर भरल्यानंतर त्यामध्ये लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड होईल. ऑनलाइन अर्ज हा तुम्ही तुमचा मोबाईल लॅपटॉप डेस्कटॉप किंवा ग्रामपंचायतीच्या संगणक कक्ष मधून पण भरू शकतात. या योजनेसाठी लागणारे चलन हे 23 रुपये 60 पैसे इतकेच आहे. यामध्ये लॉटरी पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांची नावे येतील ते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.

लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे महाडीबीटीवर विहित मुदतीत अपलोड करावे लागेल:- 

  1. जमिनीचा 7/12 उतारा
  2. 8-अ उतारा 
  3. आधार कार्ड झेरॉक्स
  4. बँक पासबुक झेरॉक्स
  5. हमीपत्र
  6. जातीचा दाखला
         ज्या शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड होईल निवड झाल्यानंतर कृषी अधिकारी त्यांच्या शेतामध्ये चाचणी करायला येईल. तसेच कागदपत्र छाननी सुद्धा केले जाईल. शेतकऱ्याला लागणारी जागा ही त्याने स्वखुशीने द्यावी.
   
         सदर योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना घ्यायचा आहे त्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून शेततळे चा लाभ घेतलेला नसावा.

        महाडीबीटी या प्रणालीवर एकच वेळा खूप साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज येतात त्यामध्ये लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची नावे येतात व त्यांची निवड होती. काही शेतकऱ्यांचे नाव जरी नाही आले तर पुढच्या लिस्टमध्ये त्यांची नावे येण्याची शक्यता असते त्यामुळे आपण परत परत अर्ज नाही जरी केला तर चालतो.

ऑनलाईन अर्ज ( online apply) :- 


हेल्पलाइन क्रमांक:- 022-49150800

      अधिक माहितीसाठी आपण जवळच्या सीएससी (CSC)सेंटरला भेट देऊ शकता.







Spread the love

Leave a Comment