रब्बी हंगाम पिक पेरा नोंदणीची सुविधा ई -पिक पाहणी मोबाईल ॲप वर उपलब्ध आहे.E-peek pahani rabbi season 2022-23.
राज्यात ई – पीक पाहणी नोंदणी करणे मोबाईल ॲप द्वारे सुरू झाली आहे. ई – पीक पाहणी हे ॲप व्हर्जन 1 नसून व्हर्जन 2 ह्या ॲप मधून करावे लागणार आहे. महसूल विभागामार्फत ही राज्यांमध्ये ई पीक पाहणी रब्बी साठी ही नोंदणी सुरू झालेली आहे. या मोबाईल ॲप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडाच्या नोंदी, आणि चालू पड किंवा कायम पड क्षेत्राच्या नोंदणी पण तुम्ही करू शकता. तसेच जर ई पीक पाहणी नोंदणी करता वेळेस तुमच्याकडून काही चुकी झाली तर त्यामध्ये तुम्ही 48 तासाच्या आत दुरुस्ती करू शकता.
ज्यांना पण रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी करायची असेल तर त्यांनी प्ले स्टोर ला जाऊन ई- पीक पाहणी व्हर्जन ॲप 2 डाऊनलोड करून त्यामध्ये तुमची सविस्तर माहिती भरणे. तसेच तुम्ही जी माहिती भरणार आहे या ॲपमध्ये ती 48 तासाच्या तुमच्या सातबारावर नोंदवली जाईल. माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा सातबारा.
शेतकऱ्यासाठी घरी बसून नोंदणी करण्याची खास सुविधा ही सरकारने चालू केली आणि यामध्ये शेतकरी विनामूल्य आपली नोंदणी पिकांची करू शकतात. त्यामुळे तुम्ही पण लगेच ॲप डाऊनलोड करा आणि सर्व आपले पिकांची माहिती नोंदणी करून घ्या.
रब्बी हंगाम पिक पेरा नोंदणीची सुविधा ई -पिक पाहणी मोबाईल ॲप वर उपलब्ध आहे.E-peek pahani rabbi season 2022-23.
जर तुम्हाला यामध्ये काही शंका काही प्रॉब्लेम येत असल्यास महाराष्ट्र शासनाने एक नंबर जारी केला आहे तुम्ही या नंबर वर कॉल करून तुमच्या शंकाच निवारण करू शकता.
मोबाईल क्रमांक :- 020-25712712
ई- पीक पाहणी चा कालावधी :-
शेतकऱ्यांनी करावयाची पीक पाणी मोबाईल ॲप द्वारे :-
हंगाम. कालावधी
खरीप. 1ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर
रब्बी. 15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी
उन्हाळी. 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल
तलाठी स्तरावर करावयाची पीक पाहणी :-
हंगाम कालावधी
खरीप. 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
रब्बी. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी
उन्हाळी. 16 एप्रिल ते 15 मे