अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना 1286 कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय.
महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी आणि विविध जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर 2022 या महिन्यांमध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाला होता. यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांचे पूर्ण पिकांचेही नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना दोन हेक्टर एवजी तीन हेक्टर दुपटीने मदत देण्याचे निर्णय राज्य शासनाने घेतला होता, त्याच्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागासाठी 1286 रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर करून देण्यात आहे यामध्ये खूप साऱ्या बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात अतिवृष्टीचा पाऊस झाला होता यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यामध्ये ज्वारी मक्का कापूस अशा प्रमाणाचे सोयाबीन अशा बहुतांश प्रमाण यांचे पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. राज्य सरकारने असं निर्णय घेतला होता की शेतकऱ्याला हेक्टरी 12 हजार रुपये किंवा 13 हजार रुपये देण्याचे निर्णय सरकारने घेतला होता. त्यासाठी सरकारने 1286 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी ,हिंगोली, नांदेड, बीड, लातूर तर पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत देणार आहे.
या शासन निर्णयानुसार जिरायत पिकाची नुकसान भरपाई पूर्वी प्रति हेक्टर 6800 हजार रुपये आणि 2 हेक्टर ची मर्यादा होती. ती आता 13600 करून 3 हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवले आहे. बागायत पिकांच्या प्रति हेक्टर साठी 13800 वरून 27 हजार रुपये इतका करण्यात आला आहे. बहुवर्षी पिकासाठी 18000 वरून 35 हजार रुपये करण्यात आला आहे.
अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात पासष्ट मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असल्यास आणि मंडळातील गावात 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यांच्या रक्कम थेट खात्यामध्ये जमा होईल. शेतकरी लाभार्थ्यांना मदत मिळाल्यानंतर त्यांची यादी थेट जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले या पिकांची नुकसान भरपाई म्हणून शासनाने हा हातभार लावलेला आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हा निधी त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होईल.