Solar Panel Rooftop Scheme : केंद्र आणि राज्य सरकाच्या विविध योजनांचा विचार केला तर समाजातील सर्वच घटकांना डोळ्यासमोर ठेऊन योजनांची आणखी करण्यात आलेली आहे. कृषिक्षेत्र असो वा इतर काही, यामध्ये अनेक योजनांच्या अनुदानाच्या स्वरुपात मदत करण्यात येते व संबंधित क्षेत्रातील सगळी कार्य हे सुलभपणे पडण्यासाठी यामुळे मदत होते. जर या योजनांचा आपण विचार केला तर अनेक प्रकारच्या योजना आहेत.
प्रत्येक योजनांचा फायदा हा वेगवेगळ्या प्रकारचा असून, आपल्या गरजेच्या असलेल्या योजनांचा फायदा घेऊ शकतो. तसेच आपण यामध्ये विचार केला तर सर्वात जास्त विजेच्या समस्या जाणवतात.
ही बाब कृषी पंपांच्या बाबतीत तर आहेच, पण घरगुती वीज वापराच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे वाढीव बिलाच्या त्रासापासून मुक्तता मिळाण्यासाठी केंद्र सरकारची सौर रुफटॉप योजना खूप महत्त्वाची आहे. नेमकी ही योजना कशा स्वरुपाचे आहे, याबद्दलची टपाशीलवार माहिती या लेखाच्या माध्यमातून घेऊ. (Solar Rooftop scheme).
Solar Panel Rooftop Scheme सौर रुफटॉप योजनेचा स्वरूप
ही योजना प्रामुख्याने केंद्र सारकारच्या उर्जा मंत्रालयातून चालवली जाते. या योजनेच्या लाभासाठी
कोणतीही व्यक्ती जर डिस्कॉम्स मध्ये समाविष्ट असेल तर कोणत्याही विकेत्यांकडून घराच्या छतावर सौर पॅनल बसऊ शकते. यामध्ये तुम्ही डिस्कॉममध्ये सामील असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून सौर पॅनल इन्स्टॉल केल्यानंतर संबधित सौर पॅनलची जवाबदारी ही संबंधीत कंपनीची असते व ती पाच वर्षासाठी असते.
तुम्ही अनुदानाचा लाभ घेऊन या योजनेच्या माध्यमातून घरच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुमच्या घराच्या गरजेनुसार वीज निर्मिती करू शकतात. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. (Solar Rooftop).