सन 2017 ते 2020 या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याचा निर्णय शासन घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची आता चौथी यादी जाहीर केली आहे यादी संबंधित बँक शाखा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना प्रकल्प प्रसिद्ध करण्यात आले आहे. या यादीत शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड कर्ज खाते पासबुक व बचत खाते पासबुक घेऊन नदीच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रामाणिकरण करून घ्यावे.
सन 2017-18,2018-19 व 2019-20 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करून शासन निर्णय मध्ये नमूद केलेल्या विविध कालावधीत परत केलेली आहे अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50000 पर्यंत पोषण पर लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये प्राथमिक दृष्ट पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या विशिष्ट क्रमांक शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये आपले सरकार सेवा केंद्र मध्ये आधार प्रामाणिक करण्यासाठी जायचे आहे.
त्या ठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्ज खात्याचा तपशील आधार क्रमांक इत्यादी बाबतची खातर जमा करू शेतकऱ्यांच्या आधार प्रामाणिकरण करायचे आहे आधार प्रमाणीकरण नंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहन पर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येईल आहे. ज्या शेतकऱ्यांची बँक कर्ज खात्याचा आधार क्रमांक उपलब्ध करून दिलेली नाही अशा शेतकऱ्यांनी नावे पुरता सामान झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना आपले नाव आले आहे की नाही हे जर चेक करायचे असेल त्यांनी जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत भेट देऊन यादीमध्ये नाव आहे का ते तपासा आणि आधार प्रामाणिकरण करून घ्या.
- आपले प्रामाणिकरण सहज व सोपे होण्यासाठी वरील प्रसिद्ध केलेले यादीमधील शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र बँक शाखा या मध्ये जाऊन प्रमाणीकरण करून घ्यावे.
1) आधार कार्ड
2) कर्ज खात्याचे व बचत खात्यातील पासबुक
3)यादीमध्ये आपल्या नावासमोरील नमूद असलेल्या विशिष्ट क्रमांक
- काही विसंगती असल्यास पोर्टलवर समितीचे बटन दाबून शेतकरी तक्रार नोंदवू शकता.
- उपयुक्त कर्ज खात्याची यादी अंतिम नसून बँकांकडून जशी माहिती उपलब्ध विद्याप्रमाणे नवीन कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.