Animal Husbandry : राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार “शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना आणली आहे. नुकतीच ही योजना राबविण्यास मान्यताही मिळाली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय- म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातू शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे.
Animal Husbandry : गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम : यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.
शेळीपालन शेड बांधकाम 10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.