Crop Insurance शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांना अध्याप देखील पिक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना पुढील पंधरा दिवसांमध्ये पिक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याविषयी सविस्तर माहिती पाहूयात.
आपण देखील जर आपल्या पिकाचा खरीप हंगामामध्ये पिक विमा Crop Insurance भरलेला असेल तर अजूनही आपल्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसते तर काळजी करण्याची काही गरज नाही कारण की लवकरच पंधरा दिवसाच्या आत मध्ये पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
सर्व कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्याची Crop Insurance भरपाई देत असून राहिलेली 503 कोटी रुपयांची रक्कम पंधरा दिवसाच्या आत मध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar यांनी विधानसभेत मंगळवारी दिली.
अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्याप्रमाणे एक रुपयांमध्ये पिक विमा Crop Insurance साठी पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार असून या योजने करता 3312 कोटीची तरतूद केली असल्याची माहिती अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली. पिक विमा लाभार्थी 63 लाख 11 हजार 235 असे आहेत. तसेच शेतकऱ्यांना दोन कोटी 356 लाख रुपयांची भरपाई पन्नास लाख 98 हजार 99 शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेली आहे. अति पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची 2342 कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत.