पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना | Post Office Monthly Saving Scheme
Post Office Monthly Saving Scheme :-
आपण जर बँकेमध्ये रक्कम ठेवत असेल तर त्याचा आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळत नाही. तुमचा असाच काही नवीन प्लॅन असेल गुंतवणूक करण्याचा तर तुमच्यासाठी एक चांगली स्कीम पोस्टाने आणलेली आहे.
Post Office MIS :-
या योजनेत गुंतवणूक केल्यास पती-पत्नीला 500 रुपये दरमहा मिळतात.पाहा कशी आहे ही योजना त्या साठी माहिती पूर्ण बघा आणि नीट लक्ष पूर्वक बघा पूर्ण सविस्तर वाचा काहीही सोडू नका.
या योजनेचे वैशिष्ट खालीलप्रमाणे आहे :-
A. कोण हे खाते उघडू शकतात.
- एकच प्रौढ व्यक्ती
- संयुक्त खाते
- अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक उघडू शकता.
B. ठेव जमा काय असेल:-
- खाते किमान १००० रुपये किंवा १००० रुपयेपेक्षा जास्त.
- किमान एका खात्यात ४.५० लाख आणि संयुक्त खात्यात ९ लाख रुपये जमा करता येतात.
- युक्त खात्यात सर्व संयुक्तधारकांना गुंतवणुकीत समान वाटा असेल.
- एखाद्या व्यक्तीने उघडलेल्या सर्व MIS खात्यातील ठेवी ४.५० लाख रुपयापेक्षा जास्त नसतील.
C. व्याज MIS मध्ये काय असेल :-
- खाते उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर आणि मदत पुरती पर्यंत व्याज देय असेल.
- दरमहा देय व्याज खातेदाराने दावा केला नसेल तर अशा व्याजावर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
- ठेवीदाराच्या हातात व्याज हे करपात्र असणार आहे.
D. मॅच्युरिटी काय असेल:-
- खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या समाप्तीनंतर संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये पासबुकसह व इतर अर्ज सादर करून अकाउंट बंद केले जाऊ शकते.
- मदत पुरती पूर्वी खातेधारकाच्या मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते आणि नाम निर्देशक व्यक्ती कायदेशीर वारसांना रक्कम परत केली जाईल.
E. खाते कोणते लागते :-
- तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेमध्ये पती-पत्नी प्रत्येक महिन्याला मिळून कमाई करू शकतात आणि एक संयुक्त खाते बनवू शकता.
या योजनेमधून मिळणारा लाभ:-
- तुम्हाला या योजनेमध्ये मिळणारे व्याजदर हे 6.6% असेल.
- या योजनेअंतर्गत वार्षिक तुमची जेवढी रक्कम जमा होईल त्या रकमेनुसार तुम्हाला रिटर्न व्याजाचा हिशोबानुसार मिळेल.
- तुम्हाला जी रक्कम मिळणार आहे ती वर्षानुसार मिळणार आहे.
- तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे ती तुम्ही प्रति महिना पण घेऊ शकता
पैसे परत कसे मिळतील:-
- या योजनेअंतर्गत पती-पत्नी जॉईंट अकाउंट मध्ये ९ लाख रुपये जमा केले तर त्यांना ९ लाखावर व्याज ६.६% दराने वर्षाने मिळेल.
- व्यजच्या दराने वार्षिक रिटर्न जे आहे ५९,४०० मिळणार.
- जर रक्कम तुम्हाला ही वर्षाला पाहिजे नसेल किंवा तुम्हाला महिन्याला हवी असेल तर तुम्ही यामध्ये प्रति महिना ४९५० रुपये या प्रमाणे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या गावातल्या पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि तिथे त्यांना संपूर्ण सविस्तर माहिती विचारून घ्या आणि नंतरच त्या योजनेचा लाभ घ्या.