Gram panchayat fund ग्रामपंचायतचा संपूर्ण लेखाजोखा बघा तुमच्या मोबाईलवर

Spread the love

Gram panchayat fund ग्रामपंचायतचा संपूर्ण लेखाजोखा बघा तुमच्या मोबाईलवर

Gram panchayat fund details, संपूर्ण ग्रामपंचायतचा लेखा जोख बघा तुमच्या मोबाईलवर, जाणून घ्या ग्रामपंचायत ने कोणत्या नावाखाली किती निधी खर्च केला.

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात ग्रामपंचायतची माहिती पाहणार आहोत,

यामध्ये तुमच्या गावातील ग्रामपंचायतने किती किधी खर्च केला आहे याची माहिती पाहणार आहोत.

त्याचा प्रमाणे यामध्ये तुमच्या गावाला किती निधी मंजूर झाला होता व तो किती खर्च करण्यात आला आहे व

अजून किती निधी खर्च करण्याची बाकी आहे याची हि माहिती या लेखात पाहणार आहोत.

तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती निधी वितरीत करण्यात आला होता व तो निधी किती प्रमाणात कामात आला आहे

किती निधी कामात आला नाही याची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

मित्रानो ग्रामीण भागामधील अनेक नागरिकाच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात, त्यासाठी शासनाच्या वतीने निधी दिला जातो.

या निधीचे पाणी पुरवठा व स्वच्छता, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक विहीर दुरुस्ती इत्यादी योजनांसाठी शासनाकडून निधी पुरवठा केला जातो.

पण अनेक नागरिकांना हा निधी किती व कधी मिळाला व तो कोणत्या कामासाठी मिळाला याची माहिती नसते.

हेही वाचा : मुख्यमंत्री सोलर पंप योजना दोन लाख सोलर पंपाचे कोटा ऑनलाईन नोंदणी सुरू झाली

Gram panchayat fund मोबाईलवरून बघा ग्रामपंचायतचा सर्व लेखा जोखा

तुमच्या गावातील विकास कामांसाठी gram panchayat fund details म्हणजेच निधी आपण जो बघणार आहोत तो एका एंड्राइड एप्लीकेशनच्या सहाय्यने बघणार आहोत.

म्हणजेच यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एंड्राइड एप्लीकेशन इंस्टाल करायचे आहे.

ग्रामपंचात निधी बघण्यासाठी गुगल प्लेस्टोअरवर अनेक एंड्राइड एप्लीकेशन्स उपलब्ध आहेत.

योग्य एप्लीकेशन नाही शोधता आले तर तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

त्यामुळे केवळ शासकीय एंड्राइड एप्लीकेशनच इंस्टाल करा जेणे करून तुमची फसवणूक होणार नाही

gram panchayat fund details संदर्भात तुम्हाला अगदी अचूक माहिती मिळेल.

ग्रामपंचायत निधी बघण्यासाठी शासनाचे अधिकृत एंड्राइड एप्लीकेशनच कसे इंस्टाल करावे आणि यामध्ये तुमच्या गावाची निवड करून कशा पद्दतीने माहिती बघावी या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

तुम्ही सांगितलेले एंड्राइड एप्लीकेशन सरकारचेच आहे आणि याच एप्लीकेशनवर आम्हाला अचूक माहिती मिलेल याची काय शाश्वती आहे असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर नक्कीच या प्रश्नांचे निरसन केले जाईल.

नरेंद्र मोदींनी दिली या एप्लिकेशनची माहिती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक २४ एप्रिल २०२० रोजी e gram swaraj portal चा शुभारंभ केला होता.

गावामध्ये जेवढेहि विकास कामे होतील त्यांचा संपूर्ण लेखा जोखा तुम्हाला या e gram swaraj app वर बघण्यास मिळेल असे त्यांनी सांगितलेले होते.

वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रधानमंत्री यांचा e gram swaraj app संदर्भातील व्हिडीओ बघितला असेल तर आता तुमची खात्री झाली असेल कि आपण या e gram swaraj app चा उपयोग करून आपल्या गावातील झालेल्या विकासकामांची अतिशय बिनचूक माहिती घेऊ शकतो.

वास्तविक हि माहिती तुम्ही e gram swaraj website वर बघू शकता.

परंतु मोबाईल एप्लीकेशनचा उपयोग करून माहिती बघितल्यास अधिक सोयीस्कर होते.

असा बघा मोबाईल वरून ग्रामपंचायतचा लेखाजोखा

  • गुगल प्ले स्टोअरमध्ये जा.
  • प्ले स्टोअरच्या सर्च मध्ये gram panchayat fund details जाणून घेण्यासाठी e gram swaraj असे टाईप करा.
  • Ministry of panchayat raj चे ई ग्राम स्वराज हे application ओपन होईल, मोबाईलमध्ये इंस्टाल करा.
  • जसे हि तुम्ही हे मोबाईल एप्लीकेशन ओपन कराल त्यावेळी राज्य, जिल्हा परिषद, block panchayat म्हणजेच तालुका आणि village मध्ये तुमचे गाव निवडल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करून सादर करा.
  • वरील प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत संदर्भातील 3 ठळक बाबी तुम्हाला दिसेल १) ER Details २) Approved Activities ३)Financial Progress
  • ज्या प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल त्या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसेल. क्रमांक 3 च्या म्हणजेच Financial Progress पर्यायावर क्लिक करून तुम्ही निधी किती आला आणि किती खर्च झाला याचा हिशोब बघू शकता.

Spread the love

Leave a Comment