PMUY : गॅस सबसिडी बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा | Gas Subsidy

Spread the love

PMUY : गॅस सबसिडी बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा | Gas Subsidy

केंद्र सरकारने उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. देशात करोडो प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर सबसिडी जाहीर केली आहे.

PMUY : गॅस सबसिडी बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा | Gas Subsidy

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12  रिफील साठी प्रति 14.2 किलोच्या सिलेंडर साठी 200 रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे. 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना नोंद  झाली.

 2022 -23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023- 24 साठी 7860 कोटी रुपये खर्च केले जातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ,आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.

 विविध राजकीय कारणामुळे एलपीजी गॅसच्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झाली आहे एलपीजीच्या वाढलेल्या दारापासून लाभार्थींचे संरक्षण करणे महत्वाचे आहे.

 ग्राहकांना एलपीजीच्या दरात दिलासा दिला तर ते एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात उज्वला योजनेतल्या ग्राहकांनी पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळावे यासाठी त्यांनी सतत एलपीजीचा अवलंब आणि वापर करणे महत्त्वाचे आहे योजनेतील ग्राहकांना एलपीजी ची सरासरी वापर 2019 -20 मधील 3.01 रिफील वरून 20% ने वाढून 2021- 22 मध्ये 3.68 झाला आहे. सर लाभार्थी या अनुदानासाठी पात्र असतील.

 ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना पेट्रोलियम गॅस स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY)सुरू केली गरीब घरातील प्रौढ महिलांना डिपॉझिट न ठेवता मोफत एलपीजी जोडणे या योजनेअंतर्गत दिली जाते.

 


Spread the love

Leave a Comment