Sinchan Vihir Anudan | नवीन सिंचन विहीर अर्ज प्रक्रिया : पात्रता निकष व अर्ज नमुना कशाप्रकारे आहे बघा.
ग्रामीण भागातील काही शेतकरी हे कोरडवाहू असतात. त्यांना विहीर नसते ते फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने योजना पुन्हा एकदा चालू केलेली आहे.
शेतकऱ्यांना भरघोस पिक व्हावे व कोणत्याही ऋतूमध्ये त्यांना पीक घेता यावे यासाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे.
Sinchan vihir Anudan : सिंचन विहिरीसाठी अर्ज कसा करायचा :-
- पात्रता काय.
- अनुदान किती दिले जाते.
- प्रस्ताव कसा द्यायचा.
- सिंचन विहिरी साठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहीर या योजने करता महाडीबीटी पोर्टल ( maha DBT ) वरती अर्ज करू शकतात.
२. रोजगार हमी योजनेअंतर्गत ( सर्वांसाठी ). Sinchan vihir anudan.
सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून यांच्यासाठी सिंचन विहीर योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते.
रोजगार हमी अंतर्गत नवीन सिंचन विहिरी साठी 100 टक्के अनुदान दिले जाते. नवीन शासन निर्णय 26 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक गावात विहीर वाटप केले जातात.
सिंचन विहीर अर्ज प्रक्रिया
दोन प्रकारे अर्ज करता येतात.
- रोजगार हमी योजनेद्वारे.( सर्वांसाठी )
- महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन. (अनुसुचित जाती जमातीसाठी).
- नमुन्यातील अर्ज,
- जॉब कार्ड झेरॉक्स,
- ग्रामसभेचा लाभार्थी निवडीचा ठराव,
- जागेचा 8-अ व 7/12 उतारा,
- आधार कार्ड झेरॉक्स,
- आधार लिंकिंग केलेले बँक पासबुकच्या झेरॉक्स,
- तलाठ्याकडील समजूतीचा नकाशा,
- हे सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.