सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित शेतकऱ्यांना दिलासा – मंत्रिमंडळ निर्णय 5 एप्रिल 2023
सततचा पाऊस राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करून शेती पिकांच्या नुकसानी करिता मदत देण्यात यावी असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेती पिकांच्या नुकसानचे पंचनामे केली जातात. शेती पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढा क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढा क्षेत्र करिता विहित दराने निविष्ठा अनुदत्त स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येतील मात्र महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामध्ये शेती पिकांची नुकसान होऊ शकते तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे देखील शेती पिकांचे नुकसान होऊ शकते अशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उप समितीच्या 29 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित बैठकीत सततच्या पावसाची साध्य कोणती परिभाषा नसल्याने आणि ती निश्चित करणे आवश्यक असल्याने शेती पिकांचे नुकसान झालेल्या योग्य शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्ताविकरीत्या योग्य निकष निश्चित करण्यासाठी कृषी विभागाने समिती नियुक्त करून करावे असे निर्णय झाला होता. त्यानुसार सततच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरता प्राप्त झालेल्या प्रास्ताविकर्ता योग्य निकष निश्चित करून शासनास शिफारशी करण्याकरिता कृषी व पदोन विभागाच्या २१ डिसेंबर 2022 च्या शासन आदेशद्वारे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली होती.
या समितीने सततच्या पावसासाठी निकष निश्चित करण्याबाबत तयार केलेले अहवाल शेती पिकांच्या नुकसानेकरिता विहित दराने मदत देण्याकरिता सततच्या पावसासाठी काही निकष सुचवले होते हा अहवाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला.
दिनांक 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत महसूल मंडळांनी सलग पाच दिवसाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान दहा मिनी पाऊस झाल्यास आणि त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील 10 वर्षाच्या सरासरी पर्जन्य वाण्याच्या तुलनेत अधिकच 50% किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास सततच्या पावसाचा पहिला ट्रिगर लागू राहील.
अशा महसूल मंडळामध्ये पहिला ट्रिगर लागू झाल्याच्या दिनांकापासून पंधराव्या दिवसापर्यंत सामान्यकृत्व वनस्पती निर्देशांक निकष पुढील प्रमाणे तपासण्यात येतील. 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत खरीप पिकांचे सामान्य कृत वनस्पती निर्देशांक फरक जर झिरो पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा कमी असल्यास स्वतःच्या पावसाचा दुसरा ट्रिगर लागू राहील. तथापि ज्या तारखेला सतत पावसाची सुरुवात झाली त्या दिवसाचा एनडीव्हीआय हा पंधराव्या दिवसाच्या एनडीबीआय पेक्षा जास्तच असायला पाहिजे.
स्वतःच्या पावसाच्या दुसऱ्या ट्रिगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे संरक्षण करून पंचनामा कार्यातील आणि ते 30 कोटी पेक्षा जास्त शेती पिकाची नुकसान झाले असल्यास मदत देण्यात येईल. त्याचप्रमाणे जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासनात प्राप्त झालेल्या सर्व प्रलंबित प्रस्ताविकरीता वरील निकष वापरून पात्र करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने मदत देण्याच्या मंत्रिमंडळ निर्णय घेतला आहे.
यापुढे राज्य शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती करिता देखील 24 तासांमध्ये 65 मीमी पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवून याबरोबर सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या ट्रिगर मधील सामान्य कृत वनस्पती निर्देशांक हा अतिरिक्त निकष शेती पिकांच्या नुकसानी करता लागू करण्यात येणार आहे. दुष्काळा व्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या पिकामुक्तीसाठी देखील निकष लागू होईल.