तुमच्या गावातील भुजलाचा नकाशा पहा ऑनलाईन
गावातील नागरिकांसाठी मोठी बातमी तुमच्या गावातील भुजलाचा नकाशा आता तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
भूजल साठा दिवसेंदिवस खाली जात असून जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे त्यासाठी कोणत्या भागात किती जलसाठा आहे याची माहिती आपल्याला असायला हवी.
हेच ओळखून भूजल विभागाने राज्यातिल सर्व गाव शहरांचा भूजल नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे त्यावर आपण आपल्या गावातील भुजलाची स्थिति जाणून घेऊ शकतो.
ही माहिती आता मोबाईल App वर उपलब्ध करून दिली जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया या विषयी सविस्तर माहिती.
तुमच्या गावातील भुजलाचा नकाशा पहा मोबाईलवर
तुमच्या गावातील भुजलाचा नकाशा आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर देखील पाहता येणार आहे
त्यासाठी आता एक मोबाईल एप्लीकेशन विकसित करण्यात येणार आहे.
लोकसंख्या वाढल्याने पाण्याची मागणी वाढत आहे, त्यात शेती, पिण्यासाठी, औद्योगीकरणसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे.
त्यात प्रमाणात पावसाचे पानी मात्र भूगर्भात सोडले जात नाही.
त्यामुळे दरवर्षी भुजलाचा स्तर खोल जात आहे मराठवाड्यात तर सातशे आठशे फुटपेक्षा अधिक खोल भूजल गेले आहे,
त्यामुळे भूजल विभागाने प्रत्येक गावाचा भूजल नकाशा तयार केला आहे. तो भूजल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोणीही आपल्या भागातील भुजलाची स्थिति तेथे जाऊन नकाशाद्वारे घेऊ शकतो.
नाकाशात भूजलाचे पाच थर आहे.
नाकाशमध्ये भुजलाचे पाच थर केलेले आहे त्यामध्ये पहिल्या स्तरावर ज्या भागात अत्यंत प्राधान्याने काम करणे आवश्यक आहे तेथे निळसर पट्टा दाखवला आहे.
त्या ठिकाणी नाला गोलीकारण, विहीरीचे पुनर्भरण करणे, बांध बंधने, आदि कामे करण्याचे सुचवले आहे. जेणेकरून भूजल पातळी चांगली राहील.
त्यानंतर पिवळा पट्टा दाखवला आहे त्यात बांध, पुनर्भरण विहीर, विधन विहीरीचे पुनर्भरण करणे, भूमिगत बंधारे विरुद्ध दिशेने उतार असलेला नाला गोलीकारण करावे. आदि कामे सुचवण्यात आली आहे.
आणखी तीन स्तर आहे त्यामध्ये सलग समतल चर, पाझर चर, दगडी बांध, कशेततळे आदि काम सुचवण्यात आले आहे.
असा पहा नकाशा
पुणे, कोकण, अमरावती, छत्रपती सांभाजीनगर, नाशिक नागपूर असे सहा विभाग भुजलाच्या संकेतस्थळावर आहे
त्यामध्ये गेल्यावर तालुका निवडा आणि मग तुमच्या गावाचे नाव टाका.
त्यानंतर नकाशा ओपन होईल तेथे प्रत्येक भागावर प्राधान्याने पट्टे केले आहे . नागरिकांना https://gsda.maharashtra.gov.in/index.php/GWRechargePriorityMap या लिंक वर नकाशा पाहता येणार आहे.
भुजलाचा नकाशा सध्या संकेतस्थळावर आहे पान आता शासनाने अजून आधुनिक पाहुल उचलले आहे
भुजलाचे नकाशे आता मोबाईल App वर उपलब्ध होणार आहे.
त्यासाठी त्यावर काम करणे सुरू असून लवकरच त्याचे App विकसित करण्यात येणार आहे.