ग्रामपंचायतिचे दाखले दिसणार महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाईल ॲप वर.आणि ग्रामपंचायतीचे सर्व कामे पण बघू शकतो

Spread the love

“ग्रामपंचायतिचे दाखले दिसणार महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाईल ॲप वर.आणि ग्रामपंचायतीचे सर्व कामे पण बघू शकतो.”| Gram panchayat certificate on maha e gram citizen connect mobile app.

  

ग्रामपंचायतिचे दाखले दिसणार महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाईल ॲप वर.आणि ग्रामपंचायतीचे सर्व कामे पण बघू शकतो

      शासनाने नुकतेच आता महा ई ग्राम सिटीजन ॲप लॉन्च केले आहे . सध्या सरकार हे लोकांचा त्रास कमी करण्यासाठी ऑनलाईन सेवेचा जास्त उपयोग करत आहे. लोकांना त्रास कमी व्हावा आणि त्यांना त्यांच्या मोबाईलवर सगळं माहिती बघता यावी. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आता नुकतेच महाई ग्राम सिटीजन ॲप लॉन्च केले आहे. या ॲप वर आपण घरबसल्या  आपण ग्रामपंचायतीचे सर्व दाखले मोबाईलवर बघू शकतो. ग्रामपंचायतची कार्यकारणी व अधिकारी वर्ग यांची पूर्ण माहिती आपण त्या ॲपवर बघू शकतो.

“ग्रामपंचायतिचे दाखले दिसणार महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाईल ॲप वर.आणि ग्रामपंचायतीचे सर्व कामे पण बघू शकतो.”| Gram panchayat certificate on maha e gram citizen connect mobile app.

     महा ई ग्राम सिटीजन ॲप चे कोणकोणते आपल्याला फायदे मिळणार आह:- 
        महा ई ग्राम सिटीजन यावरून ग्रामीण भागातील लोकांना याचा खूप फायदा होणार आहे कारण की ते आपल्या मोबाईलवर ग्रामपंचायत दाखले काढू शकतात.
     
      1. जन्म, मृत्यू ,विवाह ,नमुना-8, बीपीएल असे    प्रमाणपत्र मिळू शकतात.
     2. डेबिट कार्ड ,क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, QR code याचा वापर करून नागरिक आपले मालमत्ता कर ऑनलाईन भरू शकतात व त्याची त्यांना पावती पण मिळते.

   “महा ई ग्राम सिटीजन ॲप आपल्या मोबाईल मध्ये कसे घ्यायचे:-

      महा ई ग्राम सिटीजन ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये घ्यायचे असेल तर तुम्हाला सर्वात पहिले प्लेस्टोरला जाऊन Maha e gram citizen  हे असे सर्च करावे लागेल. तुम्हाला ते सहजरीत्या मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले रजिस्टर करणे गरजेचे आहे.

  •  ॲप ओपन झाल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला रजिस्टर करायचे आहे
  •  नंतर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचे नाव वडिलांचे नाव आडनाव मोबाईल नंबर या सर्व गोष्टी भरायचे आहे.
  •  त्यानंतर जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावर तुम्हाला एक ओटीपी येईल.
  •  नंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि यूजर आयडी तयार करायची आहे.
      पूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायची आहे. महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट या ॲपचे होम पेज ओपन होईल. त्या होम पेजवर दाखले, प्रमाणपत्र, कर भरणा ,आपले सरकार सुविधा, ग्रामपंचायत पदाधिकारी इत्यादी प्रकारचे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतील.
   
        महा इ ग्राम सिटीजन कनेक्ट हे प्रत्येकाने आपापल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेणे कारण की आपल्याला घरबसल्या ऑनलाईन दाखला,प्रमाणपत्र हे सगळे मिळणार आहे आणि त्याची त्याची ग्रामपंचायत रजिस्टर करून घेणे. नागरिकांना घरबसल्या पूर्ण दाखले मिळणार आहे आणि हा प्रशासनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.






















Spread the love

Leave a Comment