लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर अशी करायला लाचेच्या मागणीची ऑनलाईन तक्रार – Anti Corruption Bureau

Spread the love

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर अशी करायला  लाचेच्या मागणीची ऑनलाईन तक्रार – Anti Corruption Bureau

लाचलुचपत प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभारी महाराष्ट्र शासनाने धोरण आहे तेच लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे देह आहे शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवीत आहे जर कोणत्याही शासकीय कामाकरिता शासकीय लोकसेविका निलाची ची मागणी केली तर नागरिकांनी संपर्क साधावा. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्याने शक्य होऊ शकेल. समाजाला भ्रष्टाचाराच्या वेळखेतून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा.

 दूरदृष्टी :-  भ्रष्टाचार मुक्त राष्ट्राचे ध्येय साध्य करताना शासकीय यंत्रणेद्वारे आणि समाजा द्वारे भ्रष्टाचारविरोधी प्रबळ संस्कृती निर्माण करणे आणि एकात्मता व पारदर्शकता टिकून ठेवणे.

 ध्येय :-  उच्च दर्जाच्या व्यावसायिकीचे निपक्ष पातीपणाचे आणि कर्तव्य पर्यायनेची प्रदर्शन करून भ्रष्टाचार विरोधी कायद्यांच्या परिणामकारक अंमलबजावणी द्वारे भ्रष्टाचार विरुद्ध कठोरपणे संघर्ष करणे नियंत्रण करणे व भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे.

 धोरण :-  शिक्षण व जागरूकता मोहिमाद्वारे भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे तक्रारींची योग्य चौकशी करून भ्रष्ट कर्मचारी विरुद्ध दंडात्मक कारवाई द्वारे भ्रष्टाचार विरुद्ध लढा देणे आणि अटकाऊ करणे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणी गुन्हेगारी गैरवर्तन बी शोभी मालमत्ता इत्यादी संपूर्ण चौकशी करणे आणि भ्रष्ट लोकसेविकाविरुद्ध परिणामकारक खटला चालवणे.

 सौरचना :- 

  1. महाराष्ट्र शासन गृह विभागाचा शासन निर्णय क्रमांक एसीबी 1857/ 3019  दिनांक 26 नोव्हेंबर 1957 अन्वये लाचलुचपत व भ्रष्टाचाराच्या प्रतींचे निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य लासलुचपत प्रतिबंधक विभाग गठीत करण्यात आले होते.
  2.  विभागाचे मुख्यालय मुंबईत असून गृह विभाग शासन निर्णय क्रमांक अनुसार नियुक्त करण्यात आलेल्या महासंचालक विभागाची सर्वांगीण नियंत्रणाखाली व पर्यवेक्षणाखाली त्यांचे कार्य करण्यात येते. सुरुवातीला संचालक हे पद पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे होते त्यांना या केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून दर्जा देण्यात आला होता त्यानंतर या पदाची पोलीस महासंचालक अशी दर्जा वाढ करण्यात आली महासंचालक हे राज्य पोलीस महासंचालकापेक्षा अलग आहे आणि ते थेट गृह विभागातील शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करतात.
  3.  या विभागाचा पोलीस उपअधीक्षक हा ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी असेल.
  4.  अप्पर पोलीस महासंचालक सर्वसाधारणपणे या आठ युनिटच्या कामकाजावर देखरेख ठेवतील.
  5.  दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान लोकसेवा बाधित करणाऱ्या अवस्थेतून भ्रष्टाचाराचा उदय झाला आणि प्रशासनाने प्रयत्नांची प्रकाश टाकून सुद्धा त्यांची पाळीमुळे दूरवर पसरले भारत सरकारने भ्रष्टाचारास प्रतिबंध यासंबंधीने सदानंद समितीचे मार्च 1964 मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या आयोगालात असे निरीक्षण नोंदवले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य संपर्क :- 

 भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतेही घटना घडत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संपर्क साधा सुजन नागरिकांनी खालील टोल फ्री क्रमांक दूरध्वनी क्रमांक वेबसाईट ईमेल आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून संपर्क साधून तक्रार नोंदवावी.

  • टोल फ्री नंबर :- 1064 /  व्हाट्सअप नंबर :- 9930997700
  •  दूरध्वनी क्रमांक :- 022-24921212
  •  व्हाट्सअप :- 9930997700

वेबसाईट :- https://acbmaharashtra.gov.in/


Spread the love

Leave a Comment