मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सक्रिय आहे. राज्यातील पाऊस आता विश्रांती घेणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या कोसळत असलेल्या पावसाने राज्यातील आंबा तसेच फळबाग पिकाला फटका बसतोय. पुढील 48 तासात राज्यातील काही भागात पाऊस होईल मात्र यानंतर पावसाचा जोर कमी होईल. सध्या पावसासोबत वाऱ्याचा वेग अधिक असल्याने याचा परिणाम म्हणून फळबागाची नासाडी होत आहे.
मागील चार ते पाच दिवसापासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट, पाऊस होतोय. मात्र पंजाबराव डख याच्याकडून आता नवीन अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज राज्यातील बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. यात प्रामुख्याने मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, जालणा, परभणी, सोलापूर, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, यासह राज्यातील तुरळक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. काल बीड जिल्ह्यातील विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने झाडांच्या फांद्या उनमळून खाली पडल्या. काही काळासाठी वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता.
2 मे पर्यंत राज्यातील या भागात राहणार पाऊस सक्रिय पंजाबराव डख
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे. 2 मे पर्यंत राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहील. हा पाऊस सर्वदूर नसेल मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील भागात पाऊस होईल. 2 मे पासून राज्यातील वातावरण कोरडे होईल.
पंजाबराव डख म्हणतात राज्यातील पाऊस थांबणार नाही!
2 मे पर्यंत राज्यातील काही भागात पाऊस होईल. यानंतर पाऊस विश्रांती घेईल, मात्र ही विश्रांती थोडेच दिवस असेल. 5 मे पासून पुन्हा राज्यात पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, विदर्भ व मराठवाड्यातील तुरळक भागात 5 ते 7 मे दरम्यान सक्रिय राहील.
राज्यातील पारा या तारखेनंतर वाढणार!
सध्या एप्रिल महिना संपत आला तरी राज्यात उन्हाच्या झळा जाणवत नाहीत. वारंवार होणारे ढगाळ वातावरण तसेच राज्यात सक्रिय असलेला अवकाळी पाऊस यामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी तापमान नोंदवले जात आहे. मात्र 9 एप्रिल पासून राज्यातील वातावरण कोरडे राहील. यानंतर राज्यातील तापमानाचा पारा 44 ते 45 अंशापर्यंत जाईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे