हरभरा बाजार भाव घसरले सध्या काय मिळतोय भाव पहा

Spread the love

हरभरा बाजार भाव घसरले सध्या काय मिळतोय भाव पहा

बाजारपेठेतील आवक वाढल्यामुळे निर्यात वाढून देखील देशभरातील प्रमुख हरभरा उत्पादक राज्यांतील बाजारपेठांमध्ये हरभरा बाजार भाव 5,335 रुपये प्रति क्विंटल या हमीभावापेक्षा खाली घसरल्या आहेत.

चालू आठवड्यात मध्य प्रदेशातील उज्जैनच्या बदनाग बाजारपेठेत हरभरा बाजार भाव 4,600- 4,800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला, तर त्याच काळात राजस्थानच्या अलवर बाजारपेठेत हरभऱ्याचा भाव 4,500-4,600 रुपये प्रति क्विंटल राहिला.

राज्यातील अकोला बाजारपेठेत 27 एप्रिल रोजी हरभऱ्याला 4,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तर लातूरमधील औराद शाहजनी बाजरपेठेत याच दिवशी हरभऱ्याचा भाव 4,645 रुपये प्रति क्विंटल नोंदविण्यात आला.

गेल्या काही महिन्यांत देशातून हरभऱ्याच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये निर्यात 52,495 टनांपर्यंत पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीपेक्षा जवळपास दहापट जास्त आहे. एप्रिल- फेब्रुवारी 2022-23 या कालावधीत हरभऱ्याच्या एकूण निर्यातीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 195 % वाढ झाली आहे.

बांगलादेश हा भारतीय हरभऱ्याचा सर्वात मोठा खरेदीदार राहिला आहे . बांगलादेशकडून फेब्रुवारीमध्ये 47,518 टनांहून अधिक हरभऱ्याची खरेदी केली गेली आहे. भारतीय हरभऱ्याच्या हमीभावाखाली घसरलेल्या किंमती आणि कमी वाहतूक खर्च यांसारख्या कारणांमुळे बांगलादेशची निर्यात वाढली आहे. बांगलादेश पाठोपाठ इराण, मलेशिया, श्रीलंका आणि ब्रिटन या देशांनी भारतीय हरभऱ्याची सर्वाधिक खरेदी केली आहे .

 


Spread the love

Leave a Comment