पंजाबराव डख म्हणतात राज्यात मान्सून वेळेच्या आधीच धडकणार
नमस्कार शेतकरी बंधूंनो, monsoon update अखेर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकडून महाराष्ट्रात मान्सून कधी येणार याची माहिती देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभाग मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आला. इत्यादी अमेरिकन हवामान विभागाकडून यंदा भारतात पाऊसमान कमी राहील असा अंदाज वर्तवला होता. तसेच देशातील खाजगी हवामान संस्था स्कायमेट कडून सुद्धा देशात यंदा काही प्रमाणात कमी पाऊस राहील असे म्हटले होते. मात्र पंजाबराव यांच्याकडून मान्सून यंदा वेळेच्या आधी महाराष्ट्रात दस्तक देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात 21 मे पासून अवकाळी पाऊस पंजाबराव डख
सध्या राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. काही भागात 40 ते 43 अंशापर्यंत तापमानाचा पारा पोहोचला आहे. पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण कायम राहील. 21 मे पासून ते 23 मे पर्यंत राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे.
21 ते 22 मे दरम्यान मान्सून अंदमान निकोबार बेटावर दस्तक देतो. यंदा वेळेवरच म्हणजेच 21 ते 22 मे दरम्यान मान्सून monsoon update अंदमान निकोबार बेटावर आगमन करेल. यादरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होईल. या कारणांने मान्सून वेगाने प्रगती करून 1 ते 2 जून दरम्यान महाराष्ट्रात दस्तक देईल. 30 मे ते 2 जून यादरम्यान राज्यात जोरदार पाऊस होईल. या पावसावर राज्यातील काही भागातील पेरणी सुद्धा होणार असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यंदा मान्सून वेळेच्या आधी राज्यात देणार दस्तक monsoon update.
मान्सून यंदा वेळेतच अंदमान निकोबार बेटावर दाखल होईल. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाला पोषक वातावरण तयार होईल. एकंदर या परिस्थितीत मान्सून वेगाने प्रवास करत. मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रात दस्तक देईल. मान्सूनचे दमदार आगमन झाल्याने राज्यातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस होईल. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे