महिलांना मोफत पिठाची गिरण योजना, पण फक्त याच महिलांना मिळणार

Spread the love

महिलांना मोफत पिठाची गिरण योजना, पण फक्त याच महिलांना मिळणार

Mofat Pithachi Giran Yojana

नमस्कार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत गोरगरीब जनतेसाठी आणखी योजना सरकारतर्फे राबविल्या जातात. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरण पुरवणे ही एक योजना आहे. ही योजना फक्त अनुसूचित जाती व जमाती मधील महिलांसाठी आहे. त्यांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरण मिळणार आहे.

सातारा सातारा जिल्हा परिषद महिला व बाल विकास समिती यांच्यामार्फत तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये महिलांसाठी ज्या अनुसूचित जमातीत मध्ये आहेत त्यांच्यासाठी शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरण पुरवणे ही योजना चालू आहे. यासाठी तुम्हाला विहित नमुन्यात पंचायत समितीमध्ये अर्ज करावयाचा आहे.

मोफत पिठाची गिरण मिळवण्यासाठी कोण अर्ज करू शकते.

मोफत पिठाची गिरण मिळवण्यासाठी फक्त अनुसूचित जमाती मधील महिला अर्ज करू शकतात.

कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहे.

अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज

अर्जदार तरी शिकलेली कुटुंबातील अथवा लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये पर्यंत असले बाबतचा तलाठी किंवा तहसीलदार यांचा दाखला.

सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 18 ते 60 वयोगटातील मुली किंवा महिलांना घेता येईल.

अर्जदार यांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी

अर्जदार यांची बँक खातेदार अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार यांचे बँक पासबुक पहिले पानाची झेरॉक्स.

आठ अ घराचा उतारा

लाईट बिलाची झेरॉक्स

महिला व बाल विकास समितीने निवड केलेल्या भरतींना लाभ मंजूर झाल्याचे कळवण्यात येईल.

अर्ज कोठे करावा ?

विहित नमुन्यात अर्ज भरून सोबत आवश्यक कागदपत्रे भरून  तुमच्या जवळच्या पंचायत समिती मध्ये अर्ज करावा लागतो.


Spread the love

Leave a Comment