शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दरवर्षी ६००० रु मिळणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दरवर्षी ६००० रु मिळणार आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान निधीप्रमाणेच प्रत्येक हप्ता हा २००० रुपयाचा मिळणार आहे
म्हणजेच आता शेतकऱ्यांना २००० एवजी ४००० रुपयाचा हप्ता मिळणार आहे.
या संदर्भात आज मंत्री मंडळ बैठकीत चर्चा होणार आहे मंत्री मंडळ बैठक झाल्यानंतर या योजनेची अंबलबजावणी केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मिळणार आथिक मदत
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान सन्मान निधी योजनेप्रमानेच राज्यातही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री यांनी केली आहे.
या योजनेवर मंगळवारी म्हणजे आज होणाऱ्या राज्य मंत्री मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्का मोर्तब होणार आहे.
मंत्रीमंडळाच्या मंजूरी नंतर तत्काळ त्यासंबंधी आदेश काढण्यात येणार असल्याने जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६००० रुपयाचा निधी दिला जातो.
आता त्याच धर्तीवर राज्य सरकारही शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६००० रुपये देणार आहे
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकरी कुटुंबांना दोन्ही मिळून एकूण १२ हजाराचा निधी मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्यातही नवीन योजना लागू
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्यातीही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू करण्यात आली आहे.
ही नवीन योजना लागू केल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना आता वर्षाला ६००० रुपये नाही तर १२००० रुपये मिळणार आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील जेवढे शेतकरी पीएम किसान निधीचा लाभ घेत आहे त्यांना होणार आहे.
केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्यात योजनेचे निकष आहेत प्राप्तीकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधिना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
१ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमिनी आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील
या निर्णयामुळे राज्य सरकारवर वर्षाला १ हजार ८०० कोटीचा बोजा येणार आहे राज्यातील जवळपास ८३ लाख शेतकरी कुटुंबाला या योजनेचा लाभ होणार आहे.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या योजणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.