शेतकऱ्यांनो कधीही करा सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज | PM Kusum Yojana Maharashtra

Spread the love

शेतकऱ्यांनो कधीही करा सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज | PM Kusum Yojana Maharashtra

नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो सोलर पंपासाठी अनुदान, उद्दिष्ट हे पाहणार आहोत, हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, PM Kusum Yojana Maharashtra आहे, सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

PM Kusum Yojana Maharashtra

शेतकऱ्यांनो, कधीही करा सौर कृषिपंपासाठी अर्ज. प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत ‘महाऊर्जा’च्या प्रक्रियेला नाही अंतिम मुदत. PM Kusum Yojana Maharashtra शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्यासाठी महाऊर्जाने पुन्हा सुरू केलेल्या अर्ज घेण्याच्या प्रक्रियेची वेळ अजून गेलेली नाही. मात्र मुदत संपेल म्हणून संकेतस्थळावर अनेक शेतकऱ्यांकडून एकाचवेळी अर्ज केले जात असल्याने संकेतस्थळ बंद पडत आहे. वास्तविक पाहता अर्ज करण्यास कसलीही मुदत नसल्याने शेतकऱ्यांनी घाई न करता सावकाश अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे.

राज्यात आतापर्यंत २८ हजार ६०१ जणांनी अर्ज केला आहे महाऊर्जाच्या संकेतस्थळाच्या तांत्रिक त्रुटींमुळे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. संकेतस्थळावर तांत्रिक भार येऊन ते बंद पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत परिणामी शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, या योजनेसाठी अंतिम मुदत नसल्याने शेतकरी या योजनेसाठी केव्हाही अर्ज करू शकतात. संकेतस्थळ बंद होणार नखन शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास पुरेसा कालावधी आहे. अर्ज भरणाऱ्यांची संख्या मर्यादित असल्यास ही अडचण येणार नाही.

शेतकऱ्यांच्या शेतावर ५८ हजार पंप

  •  या योजनेतून शेतकऱ्यांना ९० व ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंपांचे वाटप केले आहे.
  • पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी १ लाख पंपांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
  • सप्टेंबर २०२१ पासून सुरु झालेल्या या योजनेत आतापर्यंत ५८ हजार पंप शेतकऱ्यांच्या शेतावर बसविण्यात आले आहेत.
  • महाऊर्जाने पूर्वीच्या अर्जासह नव्याने अर्ज मागविण्यासाठी १७ मेपासून संकेतस्थळ सुरु केले आहे.
  • राज्यभरातून शुक्रवारपर्यंत (दि. २६) अर्ज भरता येत नसल्याच्या आलेल्या तक्रारी- २८० तक्रारी
  • पुण्यातून सर्वाधिक २ हजार ७२९ अर्ज दाखल.

अर्ज करण्यासाठी मुदत संपलेली नाही. तसेच अंतिम मुदत ठरविण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा. प्रत्येक जिल्ह्यासाठी कोटा आहे. त्यामुळे संकेतस्थळ सुरु राहणार आहे. घाई करु नये.


Spread the love

Leave a Comment