Land Area Calculator App आता शेत जमिनीची मोजणी करा मोबाईल ॲप वर ऑनलाईन, फक्त 2 मिनिटात ।
Land Area Calcultor App : आता शेतकरी घरबसल्या मोबाईल ॲपच्या मदतीने शेत जमिनीची मोजणी ऑनलाईन करू शकतात. तरी आज आपण, या लेखात शेत जमिनीची मोजणी मोबाईल ॲपच्या मदतीने ऑनलाईन कशी करायची ? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.Land Area Calculator App
शेत जमिनीची मोजणी मोबाईल ॲपच्या मदतीने ऑनलाईन कशी करायची ?
- शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी प्रथम तुम्हाला प्ले स्टोर वरून GPS Area Calculator हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये हे ॲप उघडावे लागेल. ॲप उघडल्यानंतर तुम्हाला Lets Start असा पर्याय दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचे लोकेशन मोबाईल मध्ये येईल.
- आता तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीन वरती उजव्या कोपऱ्यात खाली लोकेशनचे चिन्ह दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर तीन पर्याय येतील त्यापैकी तुम्हाला Area या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या शेत जमिनीच्या बांधावरती क्लिक करून शेत जमीन निवडून घ्यायची आहे.
- शेत जमीन निवडून झाल्यानंतर तुमच्यासमोर मोबाईल स्क्रीनवर वरतीच शेत जमिनीचे क्षेत्रफळ येईल.
- शेत जमिनीचे क्षेत्रफळ तुम्ही गुंठा, एकर किंवा हेक्टर मध्ये पाहू शकता.Land Area Calculator App