आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना मिळणार २७ हजार रु
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना शासनाकडून २७ हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेसाठी प्रस्ताव सादर करणे सुरु झाले आहे या योजनेंतर्गत अनाथ मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवून दिली जाणार आहे.
या योजनेंतर्गत ३ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना त्यांच्या शिक्षण व पोषणासाठी दरमहा २२५० रुपये या प्रमाणे १२ महिने दिले जाणार आहे.
म्हणजेच या बालकांना वर्षाला २७ हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे या योजनेचा लाभ तुम्हाला कसा घेता येणार आहे
त्यासाठी कोणत्या ठिकाणी तुम्हाला प्रस्ताव सादर करावा लागणार आहे त्याची माहिती खाली जाणून घेऊया.
आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना मिळणार आर्थिक मदत
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची प्रभावी अंबलबजावणी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे या योजनेंतर्गत कोरोन काळात आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत मिळणार आहे.
बालकाचे आई वडील दोन्ही गमावले असले तर त्याला सुद्धा या ठिकाणी मदत दिली जाणार आहे त्यांच्या शिक्षण व पोषणासाठी दरमहा २२५० रुपये असे वर्षभर दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे व तसेच दरवर्षी नुतनीकरण करावे लागते.
बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम २०१५ व महाराष्ट्र राज्य अधिनियम २०१८ नुसार अनाथ, नीराश्रीत, निराधार, बेघर संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
संस्थेच्या वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी शासनाने बालसंगोपन योजना सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत शिक्षण व पोषणासाठी दरमहा आर्थिक मदत म्हणून निधी दिला जातो.
दरमहा प्रत्येकी २२५० रुपये मिळणार
बालसंगोपन योजनेंतर्गत बालकाला प्रतिमाह ११०० रुपये परीपोषण अनुदान मिळत होते मागील काही वर्षात याप्रमाणे संबंधित लाभार्थीना दरमहा ११०० रुपयाप्रमाणे अनुदान वाटप झाले.
३० मे २०२३ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार परिपोषण अनुदानात वाढ केली असून ११०० रुपया वरून २२५० रुपये करण्यात आले आहे.
हि वाह प्रस्तावित असून शासनाच्या निर्णयानुसार अनुदान मिळणार आहे.
कागदपत्रे व प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात माहिती
- बालक ज्या शाळेत शिक्षण घेत आहे त्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- आई वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र
- रहिवाशी दाखला
- लाभार्थी व पालकाचे आधार कार्ड
- सांभाळ करणाऱ्या पालकाचे फिटनेस तसेच हमीपत्र आदि कागदपत्रे लागतात.
बालसंगोपन योजनेंतर्गत लाभासाठी वर दिलेल्या कागदपत्रासह प्रस्ताव महिला व बाल विकास अधिकारी कार्याकायाकडे सादर करावे लागतात
या योजनेबाबत कार्यालयातून तुम्हाला आणखी सविस्तर माहिती मिळू शकते.