———————————————————————
⚡ आपल्या भारत देशामध्ये बहुसंख्य लोक असे गरीब आहे तसेच पुरुष व महिलांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करावी लागते. यामध्ये काही महिला अशा पण असतात का त्यांना गर्भवती असताना सुद्धा त्यांना काम करावे लागते कारण की त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून असतो व त्यांचा फक्त एकच स्त्रोत असतो.
———————————————————————-
⚡ काही महिला गरोदर असतं तर आणि त्या गरोदर असतानाही सुद्धा काम करतात कारण की त्यांच्याकडे उदरनिर्वाच दुसरं काही होत नसतो त्यामुळे अशा वेळेस त्यांच्या बाळाचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे सरकारने ही योजना काढलेली आहे.
———————————————————————
⚡ त्यामुळे अशा महिलांना गरोदरपणात पुरेसा सकस आहार मिळत नाही त्यामुळे भारत सरकारने 1 जानेवारी 2017 पासून मातृवंदना योजना सुरू केली आहे या योजनेतून महिलांना सहा हजार रुपये दिले जातात. ही योजना केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास आरोग्यमार्फत राबवली जाते. यामध्ये राज्याचा 40% तर केंद्राचा 60 टक्के वाटा असतो.
———————————————————————
⚡ योजनेच्या नियम व अटी:-
१. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 19 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे.
२. 1जानेवारी 2017 यानंतर गर्भधारण झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
३. एका लाभार्थ्याला या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.
——————————————————————–
⚡ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यासाठी अर्ज कसा करावा :-
⚡ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-
१. महिला आणि पतीचे आधार कार्ड.
२. दारिद्र रेषेखाली असलेले प्रमाणपत्र.
३. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते.
४. विज बिल किंवा रेशन कार्ड.
५. घरपट्टी व नळपट्टी भरलेली पावती.
६. मोबाईल नंबर.
७. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा असणे आवश्यक आहे.
———————————————————————-
⚡अर्ज येथे करा :-
Pmmvy वेबसाईटवर जाऊन करा किंवा तुमच्या गाव तुम्ही ग्रामीण भागातील असाल तुमच्या गावात अंगणवाडी मध्ये स्वयंसेविका यांच्याकडे नोंद करू शकता. जर तुम्ही शहरी भागात राहत असेल तर तुम्ही नगरपालिकेकडे तुमचं नाव रजिस्टर करू शकतात. किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र इथे पण तुम्ही नाव नोंदणी करू शकतात.
———————————————————————-