POCRA : ‘पोकरा’ नाही, म्हणा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

Spread the love

POCRA : ‘पोकरा’ नाही, म्हणा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

राज्यात हवामान अनुकूल पीकपद्धती व उपचारांना प्रोत्साहन देण्याकरिता जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्याने हवामान अनुकूल (पोकरा) प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात होती.

जागतिक बॅंकेकडे हवामान अनुकूल प्रकल्प अशी नोंद कायम ठेवत प्रकल्पाचे नामकरण आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असे करण्यात आले आहे. त्यासंबंधीचा शासन आदेश मंगळवारी (ता. ५) काढण्यात आला.

 

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, व नांदेड या जिल्ह्यांतील ४६८२ गावे.

विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्याच्या खारपाणपट्ट्यातील १३२ गावांसह जळगाव जिल्ह्यातील ४६० तसेच नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्‍यातील संपूर्ण गावे अशा एकूण ५२२० गावांमध्ये मे २०१८ पासून पोकरा प्रकल्प राबविला जात आहे. सहा वर्ष कालावधीसाठी असलेल्या या प्रकल्पाकरिता जागतिक बॅंकेने सुमारे चार हजार कोटी रुपयांची उपलब्धता केली आहे.

जागतिक बॅंकेकडे हवामान अनुकूल प्रकल्प अशी नोंद या प्रोजेक्‍टची आहे. जागतिक बॅंकेकडे या प्रकल्पाशी संबंधित पत्रव्यवहार करताना हेच नाव कायम ठेवण्यात आले आहे. मात्र कार्यालयीन पत्रव्यवहार, प्रचार, प्रसिद्धी, सभा, बैठका, भाषणे यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असा उल्लेख करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी इतर कोणतेही लघुनाम वापरण्यात येऊ नये, असेही शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Comment