Cotton Price -कापसाला किती मिळतोय दर?

Spread the love

Cotton Price -कापसाला किती मिळतोय दर?

कांदा, सोयाबीननंतर सध्या कापसाचे दरही कमी झाले असून आजच्या पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज केवळ एका बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर इथर बाजार समित्यांमध्ये चक्क ७ हजारांपेक्षा कमी दर कापसाला मिळाला. त्यातच केंद्र सरकारकडून कापसांच्या गाठीची आयात झाल्यामुळे कापसाचे दर कमीच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.Cotton Price

दरम्यान, लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. आज मध्यम स्टेपल, लांब स्टेपल, लोकल, ए.के.एच. ४ – लांब स्टेपल, एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल या कापसाची आवक बाजारात झाली होती. त्यामध्ये हिंगणघाट येथे आजच्या दिवसातील विक्रमी ७ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी किमान ६ हजार तर कमाल ७ हजार १७० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. हिंगणघाट बाजार समितीमध्ये ६ हजार ५०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. Cotton Price

आज अकोला बोरगावमंजू येथे सर्वांत जास्त ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून ७ हजार ४०० रूपये कमाल दर मिळाला. तर संगमनेर बाजार समितीमध्ये ६ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. हा आजच्या दिवसातील राज्यातील सर्वांत कमी सरासरी दर होता.
आजचे कापसाचे सविस्तर दर
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/12/2023
संगमनेर क्विंटल 100 5500 6800 6150
राळेगाव क्विंटल 4000 6500 7020 6900
भद्रावती क्विंटल 602 6800 7020 6910
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 9 6650 6650 6650
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 364 6000 6900 6600
अकोला लोकल क्विंटल 126 5530 7021 6275
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 91 7100 7400 7250
उमरेड लोकल क्विंटल 274 6400 6870 6650
देउळगाव राजा लोकल क्विंटल 2990 6600 7145 6900
वरोरा लोकल क्विंटल 4502 6450 7060 6800
वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 2122 6450 7100 6850
काटोल लोकल क्विंटल 85 6500 6850 6700
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 1215 6550 7045 6900
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 8000 6000 7170 6500
हिमायतनगर मध्यम स्टेपल क्विंटल 176 6600 6800 6700

Spread the love

Leave a Comment