‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या
How to Apply for Ayushman Bharat Card: केंद्र सरकारने केला आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल, आता ७० वर्षांवरील नागरिक घेऊ शकतील मोफत उपचार
Ayushman Bharat Yojana Details: ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू केली होती. देशातील सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकताच या योजनेचा विस्तार करण्यात आला. आता ७० वर्षांहून जास्त वय असलेल्या वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड (Ayushman Bharat Card) बनवून घ्यावे लागते. हे कार्ड असलेल्या लाभार्थ्याला वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. या योजनेअंतर्गत देशातील २९ हजारांहून जास्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस व पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ नागरिक घेऊ शकतात. ३० जून २०२४ पर्यंत या योजनेचा लाभ ३४.७ कोटी लोकांनी घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत ७० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल, असं निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.