रमाई आवास घरकुल योजना-Ramai Awas Gharkul Yojna.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबुद्ध संवर्गातील लोकांसाठी राज्य सरकारने रमाई आवास योजना सुरू केली आहे. अनुसूचित जाती व नवबुद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावले व त्यांना चांगल्या सुविधा व त्यांचे प्रश्न सुटावी तसेच म्हणून ग्रामीण भागामध्ये त्यांचे स्वच्छ जागेवर अथवा कच्च्या घरांच्या जागेवर पक्के घर बांधून देणे ही योजना शासनाने काढलेली आहे, दिनांक 15 नंबर 2008 पासून या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे.
वैशिष्ट्ये :-
-
लाभार्थी प्राधान्य क्रमाने निवड केली जाते.
-
कच्चे घर असणाऱ्या कुटुंबीयांना नवीन पक्के घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
-
SECC मध्ये किंवा पपत्र ड मध्ये नाव असणे आवश्यक आहे.
-
मनरेगा माध्यमातून लाभार्थ्यास नव्वद दिवसाचा रोजगार उपलब्ध.18000/- रुपये.
अनुदान :-
-
प्रति घरकुल शौचालय बांधकामासह साधारण क्षेत्र अनुदान रु. 1,32,000/- नक्षलग्रस्त आणि डोंगराळ क्षेत्रासाठी रु.1,42,000/-
-
नगरपालिका नगरपरिषद क्षेत्रासाठी आणि महानगरपालिकेसाठी 2,50,000/- रुपया अनुदान.
-
घर बांधकामासाठी 1,20,000/- रु इतकी तरतूद.
लाभार्थ्याची निवड:-
-
या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड ही सामाजिक आर्थिक जात संरक्षण 2011 नुसार अत्यंत पारदर्शकपणे केली जाते.
-
ही योजना फक्त अनुसूचित जातीसाठी(SC) आहे. जास्त लाभार्थीचे नाव सामाजिक आर्थिक जात संरक्षण 2011 यामध्ये नाही परंतु ज्या लाभार्थ्यांना हजाराची आवश्यकता आहे. अशा लाभार्थ्यांचे नाव जर पत्र मध्ये असती तर त्याला भरतीची निवड केली जाईल.
योजनेच्या अटी:-
-
लाभार्थ्यांचे महाराष्ट्रातील वास्तव्य किमान पंधरा वर्षे असावे.
-
योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल.
-
लाभार्थ्याची नावे स्वच्छ जागा कच्चे घर असावे.
-
यापूर्वी तर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा.
लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा:-
-
ग्रामीण क्षेत्रासाठी रु. 1 लाख.
-
तर शहरी क्षेत्रातील महानगरपालिका व नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत या भागासाठी रु. 3 लाख.
अर्जासोबत खालील प्रमाणपत्राच्या छायाप्रती जोडाव्यात:-
-
सक्षम प्राधिकार्याने दिलेल्या अर्जदाराचा जातीचा दाखला.
-
सक्षम प्राधिकार्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला.
-
रेशन कार्ड
-
जन्माचा दाखला किंवा जन्मतारीख नमूद असलेल्या शाळा सोडण्याचा दाखला.
-
सध्याच्या घरकुलाचा कुटुंब प्रमुख व कुटुंबीय रंगीत फोटो.
-
घर बांधणार आहे ती जागा स्वत मालकीची असल्याबाबत नमुना नंबर 8.
-
विद्युत निवडणूक ओळखपत्र इतर शासकीय योजना अंतर्गत मिळणारे ओळखपत्र.
-
महानगरपालिकेची मालमत्ता कर भरण्याची ची पावती.
-
सन 2005-06 च्या सर्व क्षणानुसार दारिद्र्यरेषेखाली कुटुंबामध्ये नाव समाविष्ट असल्याचे प्रमाणपत्र.
-
घरकुल बांधकामासाठी विहित नमुन्यातील शपथपत्र.
-
गुंठेवारी नकाशा.
-
अद्यावत बँक पासबुक.
अर्ज करण्याची पद्धत:-
सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, संबंधित नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांचे मार्फत.
रमाई आवास घरकुल योजना यादी:-
रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx